वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यरची प्रकृती स्थिर असल्याची माहिती भारतीय क्रिकेट मंडळाच्या वैद्यकीय पथकाने दिली आहे. ऑस्ट्रेलियाबरोबर झालेल्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात झेल टिपण्याच्या प्रयत्नात श्रेयस अय्यरच्या बरगडीच्या स्नायुमध्ये रक्तस्राव झाल्याने त्याला तातडीने सिडनीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सिडनीच्या रुग्णालयामध्ये त्याला काही कालावधीसाठी आयसीयुमध्ये ठेवण्यात आले होते. श्रेयसच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे पाहून त्याला रुग्णालयातून शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. श्रेयस अय्यर लवकरच मायदेशी पोहोचणार असून त्याला किमान दोन महिने क्रिकेटपासून अलिप्त रहावे लागेल.









