महिलेच्या पतीवर मारहाणी; दहा आरोपींविरुद्ध गुन्हा
सातारा : 39 वर्षीय महिलेने शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत शाहूपुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, महिलेच्या फिर्यादीनुसार, १७ रोजी सकाळी ११ वाजता रवींद्र निवृत्ती ढोणे, देवेंद्र उर्फ गोट्या ढोणे,राजेंद्र ढोणे, राहुल घोळ, श्रेयस पवार, प्रतीक कोळी, चैतन्य पवार, रुद्र ढोणे, मोन्या कदम, किरण कोळी उर्फ लल्ला हे महिलेच्या घरासमोर आले होते.
त्यांनी महिलेच्या पतीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. महिलेचा विनयभंग केला. या दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मोहोड करत आहेत.








