वृत्तसंस्था/ मस्कत
येथे सुरु असलेल्या आशियाई रग्बी अमिराती सेव्हन्स चषक स्पर्धेत भारतीय पुरुष रग्बी संघाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे.
या स्पर्धेतील सलामीच्या लढतीमध्ये भारतीय पुरुष रग्बी संघाने लेबेनॉनचा 14-10 असा पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने अफगाणवर 26-5 अशी मात केली. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारतीय पुरुष रग्बी संघाने इराणचा 21-7 असा फडशा पाडला. या स्पर्धेत भारताने 3 सामने जिंकले असून आता उपांत्य फेरीत भारताची गाठ सौदी अरेबियाशी होणार आहे.









