बोडस घराण्यातील नामसप्ताहाला 125 वर्षे पूर्ण
मिरज : मिरज येथील किल्ला भागात बोडस यांच्या घरी सुरू असलेल्या नामसप्ताहाला यंदा १२५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त शहरातील विविध भागातून दिंडी काढण्यात आली. यामध्ये पालखी, भजनी मंडळे यांच्यासह पारंपारिक वेशभूषेतील वारकरी सहभागी होते.
बोडस यांच्या घरी सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी गोपाळराव बोडस यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत नामसप्ताह सुरू केला. ही परंपरा त्यांचे पुत्र हरेरामपंत बोडस आणि त्यानंतर त्यांची मुलांनी अखंडित सुरू ठेवली आहे.
मिरजेतील बारकरी संप्रदायीकही यात सहभागी होतात. दरवर्षी येथील नामसप्ताह हा वारकऱ्यांच्या श्रध्देचा विषय असतो. यंदा १२५ व्या वर्षानिमित्त दिंडी काढण्यात आली. माधवराजे पटवर्धन यांच्या हस्ते पालखी पूजन झाले. माधवजी मंदिरात रिंगण सोहळा झाला.









