मयुर चराटकर
बांदा
शनिवार २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी उशिरा इन्सुलीत दाखल झालेला ओंकार हत्ती रात्रभर दोन्ही महामार्गाच्या मधील भागात ठाण मांडून होता. पहाटे सहा वाजल्यापासून तो महामार्ग ओलांडून तेरेखोल नदीपात्राच्या भागात जाण्याचा प्रयत्न करत होता. रस्त्यावर असलेली वाहनांची वर्दळ आणि हत्ती पाहण्यासाठी होणाऱ्या गर्दीमुळे वनविभागाची दमछाक झाली. अखेर साडे आठच्या सुमारास हत्ती तेरेखोल नदीपात्रालगत बागायतीत गेला. हत्ती महामार्ग ओलांडून जाताना मोठी वाहतूक कोंडी झाली होती.









