परिसरात भीतीचे वातावरण
जयसिंगपूर: जयसिंगपूर येथील गल्ली नंबर १३ मधील यु वकांतील वर्चस्ववाद दिवाळीच्या दरम्यान पुन्हा उफाळून आला. त्यातूनच २२ रोजी मध्यरात्री दोन वाजता किरकोळ कारणावरून वादावादीला सुरुवात जाती.
महेश माने यांच्या घराजवळ झालेल्या हाणामारीमध्ये सुनील पाथरवट याचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. जयसिंगपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन कारवाई केली. पाथरवट खून प्रकरणी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पाथरवट खूनातील संशयित आरोपी शेखर महादेव पाथरवट (वय ३०) सागर परशुराम कलकुटगी (वय ३१), विजय लक्ष्मण पाथरवट (वय ४५) आणि संजय लक्ष्मण पाथरवट (वय ४७) यांना केली त्यांना न्यायालयात उभे केले असता त्यांना सहा दिवस पोलीस कोठडी सुनावली. यातील रोहित पाथरवट, शिवानंद पाथरवट फरार आहेत.








