ओटवणे | प्रतिनिधी
दाणोली गावचे ग्रामदैवत श्री लिंग माऊली देवस्थानचे मुख्य मानकरी प्रभाकर उर्फ पबी बाबुराव सावंत (६०) यांचे बुधवारी २२ ऑक्टोबर रोजी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मित निधनाचा सावंत कुटुंबीयांसह सर्वांनाच धक्का बसला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेतले.दाणोलीच्या लिंग माऊलीसह केसरीचा स्वयंभू व देवसूची शेंडोबा माऊली या तीन गावच्या देवस्थानचे ते मानकरी होते. दाणोली गावठणच्या धार्मिक व सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. ते भारतीय जनता पार्टीचे दाणोली गावठणचे बुथ अध्यक्ष होते. भाजपाचे युवा नेते संदीप गावडे यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध होते. त्यांच्या पश्चात बहिणी, भावजय, पुतणे, भावोजी, भाचे, भाची असा परिवार आहे. दाणोली येथील माऊली मसाले प्रॉडक्टचे मालक विनायक सावंत तसेच मुंबईस्थित अर्जुन व प्रदीप सावंत यांचे ते काका होत.









