वृत्तसंस्था / पॅरिस
मंगळवारपासून येथे सुरू झालेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या फ्रेंच खुल्या सुपर 750 आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनचे पुरूष एकेरीतील आव्हान पहिल्याच फेरीत आयर्लंडच्या नेगुयनने संपुष्टात आणले.
पहिल्या फेरीतील सामन्यात आयर्लंडच्या नेगुयनने लक्ष्य सेनचा 21-7, 21-16 अशा सरळ गेम्समध्ये फडशा पाडत विजयी सलामी दिली. लक्ष्य सेनने अलिकडेच झालेल्या हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. तसेच गेल्या आठवड्यात झालेल्या डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनने नेगुयनचा पराभव केला होता. पण फ्रेंच बॅडमिंटन स्पर्धेत नेगुयनने आपल्या उत्कृष्ट आणि वेगवान स्मॅश फटक्यांच्या जोरावर लक्ष्य सेनला पराभूत केले. त्याने या सामन्यात क्रॉस फटके मारुन लक्ष्य सेनला चांगलेच दमविले.









