वार्ताहर/किणये
सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत खादरवाडी हायस्कूलची महिला मल्ल श्रृती शिवनगेकरने 36 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळविला. या यशामुळे तिची आता बेंगळूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेकरीता तिची निवड करण्यात आली आहे. खुशी पाटीलने 49 किलो वजन गटात द्वितीय क्रमांक पटकाविला. तिला क्रीडा शिक्षक जी. व्ही. गुरव, अमित बिर्जे व इतरांचे मार्गदर्शन लाभले आहे.









