वृत्तसंस्था / मनामा (बहरीन)
येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धेला प्रारंभ झाल्यानंतर 15 वर्षीय खुशीने कुराश या क्रीडा प्रकारात कांस्यपदक मिळवून भारताचे पदकतक्त्यात खाते उघडले.
या स्पर्धेत कुराश या क्रीडा प्रकारात महिलांच्या 70 किलो वजन गटात खुशी भारताचे प्रतिनिधीत्व करीत होती. पण या क्रीडा प्रकारात तिला एकही लढत न जिंकता कांस्यपदक मिळाले. सहा जणांच्या ड्रॉमध्ये खुशीला उपांत्यपूर्व फेरीत पुढे चाल मिळाली. उपांत्यपूर्व फेरीत तिला उझ्बेकच्या टुरसोनोव्हाकडून हार पत्करावी लागली. दरम्यान या स्पर्धेत कांस्यपदकासाठी प्ले ऑफ लढत नसल्याने खुशीला कांस्यपदकाची मानकरी म्हणून घोषित करण्यात आले.









