वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बहरीनमधील मनामा येथे 22 ते 31 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या तिसऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत भारताचे 222 सदस्यांचे पथक सहभागी होत आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 21 क्रीडा प्रकारांचा समावेश राहील.
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी क्रीडा मंत्रालयाने 119 पुरुष आणि 103 महिला स्पर्धकांची निवड केली आहे. या स्पर्धेसाठी भारत शासनाकडून सर्व खेळाडूंचा खर्च केला जाणार आहे. भारतीय क्रीडा पथकामध्ये 90 प्रशिक्षक, फिजिओ आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश राहील. त्यामुळे भारताचे हे पथक एकूण 312 सदस्यांचे राहील. भारतीय पथकातील 31 खेळाडू फिल्ड आणि ट्रॅक (अॅथलेटिक्स), 14 मुष्टीयुद्ध, 28 कब•ाr, 16 हँडबॉल, तायक्वाँदो, कुस्ती आणि वेटलिफ्टींग प्रकारात प्रत्येकी 10 खेळाडू सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे भारतीय पथकातील काही खेळाडू जलतरण, बॅडमिंटन, ज्युडो, कुराश, तेकबॉल यामध्ये सहभागी होणार आहेत.
…..









