सांगली कोल्हापूर रस्त्याचा रुंदीकरण प्रकल्प गतीने
सांगली : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतून जाणाऱ्या कोल्हापूर रस्त्याच्या रुंदीकरण प्रकल्पाला गती देण्यासाठी, रस्त्याच्या मार्गातील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन स्थलांतरित करण्याचे काम येत्या ८ दिवसांत पूर्ण करण्याची योजना महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आखली आहे. आयुक्त सत्यम गांधी यांनी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे.
पाणीपुरवठा विभागाने तातडीने कामाला सुरुवात केली आहे. कार्यकारी अभियंता कामाचा तपशील नियंत्रणाखाली चिदानंद कुरणे आणि उप अभियंता अमीर हमजा मुलानी यांच्या स्थलांतरित कराव्या लागणाऱ्या पाईपलाईनच्या लाईन-आऊटची पाहणी करण्यात आली आहे.









