वृत्तसंस्था / लाहोर
पाकच्या टी-20 संघामध्ये माजी कर्णधार बाबर आझमचे पुनरागमन झाले आहे. पाक संघाच्या आता द.आफ्रिकेबरोबर दोन मालिका खेळविल्या जाणार आहेत. सध्या पाक आणि द.आफ्रिका यांच्यात दोन सामन्याची कसोटी मालिका खेळविली जात आहे. ही मालिका 24 ऑक्टोबरला समाप्त होणार आहे. त्यानंतर उभय संघात तीन सामन्यांची वनडे आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे.
पाक वनडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सध्या मोहम्मद रिझवानकडे आहे. पण पीसीबीने रिझवानच्या जागी दुसऱ्या खेळाडूकडे ही जबाबदारी सोपविण्याचे ठरविले आहे. पाक टी-20 संघाचा कर्णधार सलमान अली आगा याच्याकडे वनडे संघाचे नेतृत्वाची येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र द.आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी बाबर आझमचे संघात पुनरागमन अपेक्षित आहे.









