एसी, फ्रीज देखील चालवता येणार : सुरुवातीची किंमत 30 हजार रुपये
वृत्तसंस्था/बेंगळूर
वाहन उत्पादनात कार्यरत असलेली कंपनी ओला इलेक्ट्रिक यांनी 16 ऑक्टोबर रोजी त्यांचे पहिले नॉन-व्हेइक्युलर उत्पादन ‘ओला शक्ती’ लाँच केले आहे. ही एक होम बॅटरी सिस्टम आहे, जी सौर किंवा ग्रिडवरून वीज साठवण्याचे काम करते. याची सुरुवातीची किंमत 29,999 रुपये आहे, जी वेबसाइट किंवा स्टोअरवरून 999 रुपये देऊन बुक करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. याची डिलिव्हरी मकर संक्रांती 2026 पासून सुरू होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
ओला शक्ती पूर्णपणे भारतीय बनावटीची
ही ओला इलेक्ट्रिकची पहिली रेसिडेन्शियल बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम आहे. ती पूर्णपणे भारतात डिझाइन, इंजिनिअर आणि उत्पादित केली आहे. त्याची भारतात 4680 विक्री आहे. ते एअर कंडिशनर, फ्रिज, इंडक्शन कुकटॉप, फार्म पंप आणि कम्युनिकेशन डिव्हाइसेससारख्या गोष्टींना आवश्यक ऊर्जा देऊ शकते. ती ईव्ही बॅटरीसारखी आहे, परंतु घरगुती वापरासाठीच याचा वापर करता येणार असल्याची माहीती सध्यातरी दिली जात आहे.
दोन तासांत पूर्ण चार्ज
ही सिस्टीम घरगुती उपकरणांना व्होल्टेज चढउतारांपासून संरक्षण देते. यात आयपी67 रेटेड वेदरप्रूफ बॅटरी आहे. म्हणजेच, ती धूळ, पाणी आणि पावसाळ्याच्या परिस्थितीचा सामना करू शकते. फक्त दोन तासांत पूर्ण चार्ज हेते आणि पूर्ण लोडवर 1.5 तासांपर्यंत बॅकअप मिळतो.
वैयक्तिक उर्जेचा वापर बदलेल
ओलाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक भाविश अग्रवाल यांनी लाँच दरम्यान सांगितले की, हा ऊर्जा साठवणूक उपाय वैयक्तिक ऊर्जेचा वापर पूर्णपणे बदलेल. हे पॉवर बॅकअप, सौर साठवणूक, व्होल्टेज स्थिरीकरणासाठीचे एक उत्पादन आहे. त्याची देखभाल देखील खूपच कमी आहे.
ऊर्जा साठवणूक बाजारात प्रवेश
ओला इलेक्ट्रिक ऊर्जा साठवणूक बाजारात प्रवेश करण्याची योजना आखत आहे. ओलाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक भाविश अग्रवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आणि याचे संकेत दिले. भाविश अग्रवाल यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘मी शक्तीबद्दल खूप उत्सुक आहे.
कसे वेगळे आहे ?
आमच्या इन्व्हर्टर बसेस वीज कपातीच्या वेळी बॅटरीमधून डीसी ते एसी रूपांतरित करून घरगुती उपकरणे चालवतात, परंतु ओला शक्ती हे एक संपूर्ण ऊर्जा साठवणूकीचे उत्पादन आहे. याचा अर्थ, ते वीज साठवण्यासाठी, सौर ऊर्जा वाचवण्यासाठी, व्होल्टेज स्थिर ठेवण्यासाठी आणि पोर्टेबल वापरासाठी उपयोगात येते.









