वृत्तसंस्था/ कोलकता
राष्ट्रकुल क्रीडा कार्यकारी मंडळाने बुधवारी 2030 च्या शतकोत्तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी प्रस्तावित यजमान शहर म्हणून गुजरातमधील अहमदाबादची शिफारस केली. याबाबतचा अंतिम निर्णय 26 नोव्हेंबर रोजी ग्लासगो येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा महासभेत होईल, असे एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. राष्ट्रकुल क्रीडा क्रीडाचे अंतरिम अध्यक्ष डॉ. डोनाल्ड रुकारे यांनी हा क्षण आपल्या शतकोत्तर क्रीडा स्पर्धेकडे पाहत असताना या चळवळीसाठी एक महत्त्वाचा टप्पा म्हणून वर्णन केला.भारतीय ऑलिंम्पीक संघटना आणि राष्ट्रकुल क्रीडा संघटना इंडियाचे अध्यक्ष पी.टी. उषा म्हणाल्या, हे खेळ केवळ भारताच्या जागतिक दर्जाच्या क्रीडा आणि स्पर्धा क्षमतांचे प्रदर्शनच करणार नाहीत तर विकसित भारत 2047 च्या दिशेने आपल्या राष्ट्रीय प्रवासात अर्थपूर्ण भूमिका बजावतील असे त्या म्हणाल्या.









