हणजूण कोमुनिदादची जमीन विक्री प्रकरण : नोंदणी आणि डिजिटल रेकॉर्ड जप्त
पणजी : राज्यातील जमीन घोटाळा प्रकरणात यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित चौकशीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), 2002 च्या तरतुदींनुसार शोध मोहीम राबवून सुमारे 1 कोटी 25 लाख रुपये किमतीचे क्रिप्टो करन्सी चलन जप्त केले आहे. ‘मेसर्स थिंकिंग ऑफ यू’चे भागीदार उमर झहूर शाह आणि नीरज शर्मा आणि मेसर्स पर्पल मार्टिनी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक राजेश कुमार यांच्या ठिकाणांवर छापे मारून 1.5 लाख अमेरिकन डॉलर्स (सुमारे 1 कोटी 25 लाख रुपये) किमतीच्या क्रिप्टोकरन्सी असलेले क्रिप्टो पाकिट सापडले, ते गोठवण्यात आले आहे. विविध जमिनींच्या बेहिशेबी रोख गुंतवणूक दर्शविणाऱ्या नोंदणी आणि डिजिटल रेकॉर्ड देखील जप्त केले आहेत. गोवा पोलिसांनी यशवंत सावंत आणि इतरांविरुद्ध हणजूण येथील कोमुनिदादच्या च्या सर्वे क्रमांक 496/1-ए या जमिनीची बेकायदेशीर कागदपत्रे तयार करून कोमुनिदादला फसवल्याच्या आरोपाखाली दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारित ईडीकडून ही चौकशी सुरु आहे.









