अहमदाबाद
दोहा येथून हाँगकाँगच्या दिशेने जाणाऱ्या कतार एअरवेजच्या विमानाचे अहमदाबाद विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले आहे. विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यावर वैमानिकाने नियंत्रण कक्षाशी संपर्क साधत अहमदाबादमध्ये लँडिंग करण्याची अनुमती मागितली. अनुमती मिळताच विमान दुपारी 2.32 वाजता सुरक्षितपणे लँड करविण्यात आले. विमान धावपट्टीवर उतरताच अग्निशमन दल, रुग्णवाहिका, तंत्रज्ञांचे पथक सक्रीय झाले. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असून कुणीच जखमी झाले नसल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.









