वृत्तसंस्था/ वुहान (चीन)
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरु असलेल्या वुहान खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अमेरिकेची कोको गॉफ आणि सहावी मानांकित जेसिका पेगुला यांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. जस्मिन पाओलिनी आणि आर्यना साबालेंका यांचे आव्हान संपुष्टात आले. गॉफ व जेसिका पेगुला यांच्यात जेतेपदाची लढत होईल.
उपांत्य फेरीच्या सामन्यात कोको गॉफने जस्मिन पाओलिनीचा 6-4, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. तर टॉप सिडेड आर्यना साबालेंकाचे आव्हान पेगुलाने संपुष्टात आणले. जेसिका पेगुलाने उपांत्य फेरीच्या लढतीत साबालेंकाचा 2-6, 6-4, 7-6 (7-2) असा पराभव केला. या पराभवामुळे साबालेंकाची यापूर्वीची सलग 20 सामने जिंकण्याची वाटचाल खंडीत झाली आहे. 2018 साली आणि 2019 आणि 2024 साली साबालेंकाने वुहान टेनिस स्पर्धा जिंकली होती.









