न्हावेली/वार्ताहर
वेत्ये येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यासाठी विशेष ग्रामसभा श्री कलेश्वर पूर्वी देवी मंदिरात उत्साहात संपन्न झाली.यावेळी सावंतवाडी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक,पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण,तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ गोरे,मंडल कृषी अधिकारी मनोज देऊलकर,पाणी व स्वच्छता विभाग पंचायत समितीचे अविनाश सावंत,समिल नाईक,मंडल अधिकारी सुधीर मालवणकर,पंचायत राज संस्था आणि समूह ग्रामसंघ व प्रभाग संघाच्या बीआरपी प्राची राऊळ,सिंधु कन्या महिला फार्मर कंपनीच्या अध्यक्षा नितेशा नाईक,आरोग्य कर्मचारी श्री दाढेल,सहाय्यक कृषी अधिकारी मीनाक्षी वाढई,माजी सभापती रमेश गावकर,सरपंच गुणाजी गावडे,माजी सरपंच नरेंद्र मिठबावकर,उपसरपंच महेश गावडे,ग्रामपंचायत सदस्य स्नेहा मिठबावकर,नंदिनी निगुडकर,तन्वी गावकर,राजेंद्र आंबेकर,शितल खांबल,समिती सदस्य कृष्णा पेडणेकर,सागर गावडे,बाबुराव तेंडोलकर,परशुराम पाटकर,दिनेश नाईक,अंकुश गावकर,आशिष गावकर,जितेंद्र गावकर,कविता हरमलकर,शेखर खांबल,सत्यवान गावडे,ज्ञानेश्वर गावकर,शरद जाधव,संतोष गावडे,एकनाथ गावडे,भिवा पाटकर, संदिप गावडे,दर्शन हरमलकर,संतोष गावकर, शशिकांत देऊलकर,रामचंद्र पाटकर,सुशिल कोळेकर,गिरीश खांबल,अमित नाईक,हरिश्चंद्र गावकर, कृष्णा गावडे,पुंडलिक देऊलकर, महेश गावडे,मुकुंद आंबेकर,यशवंत गावडे,स्नेहा गावडे,संतोषी गावकर,देविदास पाटकर,रामचंद्र निगुडकर,सुरज गावडे,प्रकाश देऊलकर,विजय गावडे,समिर खांबल,आंनद नाईक,प्रथमेश गावडे आदी उपस्थित होते.दरम्यान, यावेळी पंचायत राज संस्था आणि समूह ग्रामसंघ व प्रभाग संघाच्या बीआरपी प्राची राऊळ यांनी सभेला मार्गदर्शन केले.माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गजानन गावडे यांनी सभेचे सूत्रसंचालन केले.तसेच ग्रामपंचायत अधिकारी स्वाती कदम यांनी सभेचे प्रशासकीय कामकाज पाहिले सरपंच गुणाजी गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्वानी सहभाग वाढविण्याचे आवाहन केले.









