माडगुळेत दोन कुटुंबात हाणामारी
आटपाडी : माडगुळे येथे दोन कुटुंबात किरकोळ कारणावरून झालेल्या वादंगाचे पर्यवसन हाणामारीत झाले. काठी, दगडाने झालेल्या मारहाणीत तिघे जखमी झाले. परस्परविरोधी फिर्यादीवरून चौघांबर आटपाडी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.
माडगुळे येथील शिवाजी आनंद लिंगडे यांच्या फिर्यादीवरून कांताबाई हरी लिंगडे, सोमनाथ हरी लिंगडे यांच्यावर तर कांताबाई हरिदास लिंगडे यांच्या फिर्यादीवरून शिवाजी लिंगडे, तानाजी लिंगडे यांच्यावर गुन्हा दाखल केला. शिवीगाळ करत असल्याने पुतण्याला जाब विचारल्यानंतर मारहाण झाल्याची तक्रार शिवाजी लिंगडे यांनी दिली.
तर घरासमोर येवुन शिवीगाळ करत असताना त्याचा जाब विचारल्याने दिर आणि दिराच्या मुलाने काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे कांताबाई लिंगडे यांनी तक्रारीत म्हटले आहे. या घटनेत तिघेजण जखमी असून परस्परविरोधी फिर्यादीवरून चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले.








