वृत्तसंस्था / व्हॅनेटा (फिनलँड)
येथे सुरू असलेल्या आर्किटीक खुल्या सुपर 500 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या अनमोल खर्बचे आव्हान जपानच्या यामागुचीने संपुष्टात आणले.
जपानच्या यामागुचीने शनिवारी झालेल्या सामन्यात 18 वर्षीय अनमोल खर्बचा 21-10, 21-13 अशा सरळ गेम्समध्ये केवळ 29 मिनिटांत पराभव केला. आता थायलंडच्या बुसानेन आणि इंटेनॉन यांच्यातील होणाऱ्या सामन्यातील विजयी खेळाडूंबरोबर यामागुचीचा पुढील सामना होणार आहे. 18 वर्षीय अनमोल खर्ब ही फरिदाबादची रहिवासी असून तिने या स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. या स्पर्धेत तिने अव्वल बॅडमिंटनपटू वेन हेसु तसेच सहावे मानांकीत लीन ती आणि डेन्मार्कच्या अॅमेली शुल्झचा पराभव करत उपात्य फेरीपर्यंत मजल मारली होती.









