ओटवणे । प्रतिनिधी
ओटवणे – देऊळवाडी येथील रहिवासी कल्पना वसंत भिसे (८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सुन, नातवंडे, जावई असा परिवार आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश भिसे यांच्या त्या मातोश्री होत तर ओटवणे येथील बागायतदार एकनाथ झोळंबेकर तसेच साळगाव येथील अजय टिळवे यांच्या त्या सासू होत.









