वार्ताहर/सांबरा
दैनिक तरुण भारततर्फे काढण्यात आलेल्या श्रीक्षेत्र पंत बाळेकुंद्री येथील श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांच्या 120 व्या पुण्यतिथी उत्सवाच्या विशेषांकाचा प्रकाशन सोहळा गुरुवारी मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात पार पडला. नृसिंह पंतवाङ्मय प्रकाशन व प्रसार मंडळाचे अध्यक्ष आप्पा दड्डीकर, वृंदा देशमुख, तुळशीदास तमरखाने, प्रदीप खेतमर, श्रीवत्स कुलकर्णी, सुहास सातोसकर, संतोष सातोसकर, बबन कदम आदींच्या हस्ते विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी सर्वांनी या विशेषांकाचे कौतुक केले.










