उडपीचा सुरज सिंग उपविजेता तर उत्कृष्ट पोझर चिराग : राज्यातील 100 हून अधिक शरीरसौष्ठवपटूंचा स्पर्धेत सहभाग
बेळगाव : उडपी येथे कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना व उडपी जिल्हा शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दसरोत्सवानिमित्त मि. उडपी दसरा स्पर्धेत बेळगावच्या व्ही. बी. किरणने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर मि. उडपी दसरा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा किताब पटकाविला. उडपीच्या सुरज सिंगने उपविजेतेपद पटकाविले.तर उडपीच्या चिरागने उत्कृष्ट पोझर हा बहुमान मिळविला.
निकाल पुढील प्रमाणे-
55 किलो गटात 1) प्रतिश (मंगळूर), 2) राजू मुचंडीकर (बेळगाव), 3) कृष्णप्रसाद (उडुपी), 4) राजेश कलाल (मंगळूर), 5) यशवंत (मंगळूर).
60 किलो गटात 1) सूरज भंडारी (बेळगाव), 2) सोमशेखर खार्वी (उडुपी), 3) विश्वनाथ दंडीन (गदग), 4) मंजुनाथ कलघटगी (बेळगाव), 5) चिराग पुजारी (उडुपी). 65 किलो गटात 1) धनंजय आचार्य (मंगळूर), 2) आकाश साळुंखे (बेळगाव), 3) रुपेश (मंगळूर), 4) मनोहर कुलाल (मगलूर), 5) हर्षल बीआर (मंगळूर).70 किलो गटात 1) प्रताप कालकुंद्रीकर (बेळगाव), 2) रणजीतकुमार (शिमोगा), 3) रोनक गवस (बेळगाव), 4) चिराग पुजारी (उडुपी), 5) शशांक (मंगळूर). 75 किलो गटात 1) वेंकटेश ताशीलदार (बेळगाव), 2) विनायक पी. (शिमोगा), 3) सुनील भातकांडे (बेळगाव), 4) प्रथम पुजारी (मंगळूर), 5) अब्दुल करीम (उडुपी). 80 किलो गटात 1) सूरजसिंग (उडुपी), 2) सलमान (मंगळूर), 3) नैदिलकुमार (उडुपी), 4) गजानन काकतीकर (बेळगाव), 5) भावेश (उडुपी).
80 वरील वजनी गटात 1) व्ही. बी. किरण (बेळगाव), 2) सत्यनारायण (दावणगिरी), 3) गिरीश (धारवाड), 4) सचिन पुतरण (मंगळूर), 5) श्रीवर्धन रेड्डी (विजापूर) यांनी विजेतेपद पटकाविले. तर मि. उडपी दसरा किताबासाठी प्रतिश, सुरज भंडारी, धनंजय आचार्य, प्रताप कालकुंद्रीकर, व्यंकटेश ताशिलदार, सुरज सिंग, व्ही. बी. किरण यांच्यात लढत झाली. त्यामध्ये व्ही. बी. किरण, सुरज सिंग व व्यंकटेश ताशिलदार यांच्यात तुलनात्मक लढत झाली. त्यामध्ये बेळगावच्या व्ही. बी. किरणने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा किताब पटकाविला. तर सुरज सिंगला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेकांना मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व्ही. बी. किरण, सुरज सिंग यांना मानाचा किताब, आकर्षक चषक व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून अजित सिद्दण्णावर, जे. डी. भट्ट, जे. निलकंठ, दिलीप कुमार, उमा महेश, गंगाधर एम, हेमंत हावळ, आरीफ कुशगल, सुनील राऊत, जॉन्सन, विश्वनाथ कामते यांच्यासह इतर पंचांनी काम पहिले.









