वृत्तसंस्था / बिजिंग
डब्ल्यूटीए टूरवरील येथे झालेल्या चायना खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय हार्डकोर्ट टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद अमेरिकेच्या तृतिय मानांकीत अमंदा अॅनिसिमोव्हाने पटकाविताना आपल्याच देशाच्या नोस्कोव्हाचा पराभव केला.
या स्पर्धेतील झालेल्या अंतिम सामन्यात अॅनिसिमोव्हाने लिंडा नोस्कोव्हाचा 6-0, 2-6, 6-2 असा पराभव केला. अॅनिसिमोव्हाने या स्पर्धेत उपांत्य फेरीत आपल्याच देशाच्या टॉपसिडेड कोको गॉफला पराभवाचा धक्का देत अंतिम फेरी गाठली होती. 2025 च्या टेनिस हंगामात अॅनिसिमोव्हाने अमेरिकन आणि विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले असून ती आता मानांकनात चौथ्या स्थानावर आहे. डब्ल्यूटीए टूरवरील 1000 दर्जाच्या स्पर्धेतील अॅनिसिमोव्हाचे हे दुसरे विजेतेपद आहे.









