वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लॉरेन्स बिश्नोई टोळी आणि दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनल (बीकेआय) यांच्यातील सुरू असलेल्या दहशतवादी-गँगस्टर संबंध प्रकरणात एनआयएने आणखी एक आरोपपत्र दाखल केले आहे. 2022 मध्ये हा खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आतापर्यंत 22 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अलिकडच्या कारवाईत एनआयएने राहुल सरकार नामक संशयिताचे नाव आरोपपत्रात समाविष्ट केले आहे. राहुल सरकार हा आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि बँक पासबुक यांसारखे बनावट ओळखपत्र तयार करून लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सदस्यांना मदत करत होता, असे तपासात आढळून आले आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने 4 ऑगस्ट 2022 रोजी पहिल्यांदा हा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर 26 ऑगस्ट 2022 रोजी हा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला होता.









