कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली माहिती
by संतोष रणदिवे – पाटील
पंढरपूर : कार्तिकी शुध्द एकादशी रविवार दि. 02 नोव्हेंबर, 2025 रोजी असून, यात्रा कालावधी दि.22 ऑक्टो. ते 05 नोव्हें. असा राहणार आहे. कार्तिकी एकादशीला श्री विठ्ठल रूक्मिणीमातेची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी यांचे शुभहस्ते होणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
राज्याच्या मंत्रिमंडळात सध्या दोन उपमुख्यमंत्री असल्याने कोणत्या मान्यवरांच्या हस्ते पूजा करावी याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले होते. त्यावर आज दि.06 ऑक्टोंबर रोजी शासनाने लेखी मार्गदर्शन केले असून, यंदाची कार्तिकी एकादशीची श्री विठ्ठल रूक्मिणीमातेची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंदिर समितीच्यावतीने पुजेचे निमंत्रण देण्यात येणार आहे.








