जवळपास सात लाख ९० हजार रुपयांची फसवणूक
सांगली : व्यवसायासाठी आर्थिक मदत करुनही ते पैसे परत न करता धमकी देण्यात आली. यामध्ये जवळपास सात लाख ९० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. यामधील तीन लाख ४० हजार रुपये परत मिळाले आहेत. तर उर्वरित चार लाख ३९ व्यवसायासाठी म्हणून केली होती सुमारे ८ लाखांची मदत ३ लाख परत केले, मात्र उर्वरित रक्कम मागितल्यावर दिली धमकी हजार रुपये मिळावेत म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सुनिल सहदेव टाकवडे (रा. कोकणे गल्ली, मिरज) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी माधव सुधीर बेरा (वय ३९ रा. कापड पेठ) यांनी संशयित सुनिल सहदेव टाकवडे यांना व्यवसायासाठी आर्थिक मदत म्हणून सात लाख ७९, हजार रुपये दिले होते.
त्यानंतर त्यांनी एकूण तीन, लाख ४० हजार रुपये फिर्यादीला परत दिले. उर्वरीत राहिलेले फिर्यादीचे ४ लाख ३९ हजार रुपये परत न देता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली आहे. तसेच फिर्यादीने पैसे मागितले असता आरोपीने जीवे मारण्यानी धमकी दिली आहे. त्यामुळे फिर्यादी यांनी संशयित सुनिल सहदेव टाकवडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.








