विभागीय फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर टिळकवाडी सार्वजनिक शिक्षण खात्याच्या विभागीय स्तरीय प्राथमिक मुला मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत उद्घाटनच्या दिवशी बेळगाव चिकोडी, बागलकोट यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ, जिल्हा शारीरिक शिक्षणाधिकारी जुनेद पटेल, प्रणय शेट्टी, राकेश कांबळे, पवन कांबळे, मच्छिंद्र भोसले, मोनाप्पा पाटील, संत मीराच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार उमेश दप्तरदार, पीईओ जहिदा पटेल, साधना बद्री, प्रवीण पाटील, नागराज भगवंतण्णावर, रमेश सिंगद, भरत बळ्ळारी, चंद्रकांत पाटील, पुनित शेट्टी प्रसन्ना शेट्टी,आदी मान्यवराच्या हस्ते भारत माता फोटाचे पूजन, तसेच दीपप्रज्वलन व श्रीफळ वाढवून करण्यात आले. पाहुण्याना खेळाडूंची ओळख करून देण्यात आल्यानंतर फुटबॉलला किक मारून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी पंच मानस नायक, उमेश मजुकर, हर्ष रेडेकर, रामलिंग परीट, संतोष दळवी उमेश बेळगुंदकर, अनिल जनगौडा, अनिल गोरे, विजय रेडेकर उपस्थित होते. या स्पर्धेत बेळगाव, गदग, हावेरी, धारवाड, विजापूर, बागलकोट, चिकोडी, शिरसी, कारवार येथील प्राथमिक मुला-मुलींच्या संघांनी सहभाग घेतला आहे.









