वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताच्या घरातील एक खोली कोणीतही आपल्या ताब्यात बेकायदेशीररित्या ठेवली आहे. तथापि, एकना एक दिवस ही खोली आपल्याला परत मिळणार आहे. अखंड भारत पुन्हा अस्तित्वात येणार आहे, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केला आहे. मध्यप्रदेशातील सतना येथे एका जनसभेत रविवारी भाषण करीत असताना त्यांनी हे प्रतिपादन केले. भारताचा काही भाग आज अन्यांनी हिसावला असला, तरी आपली संस्कृती एक आहे. भारतीय नागरीकांनी भाषा, वेषभूषा, पूजाआर्चा, भोजन आणि संस्कृतीशी संबंधित इतर सर्व भारतीय बाबीच स्वीकारल्या पाहिजेत. आमच्या संस्कृतीला आम्ही कधीही अंतर देता कामा नये, अशी मांडणीही भागवत यांनी केली आहे.









