प्रतिनिधी/ बेंगळूर
कोणाला काहीही आक्षेप असला तरी सर्वेक्षण केले जाईल. सर्वेक्षण ऐच्छिक असून लोक त्यांना हवे ते उत्तर देऊ शकतात. जर त्यांना कोणत्याही प्रश्नाचे उत्तर द्यायचे नसेल तर त्याकडे लक्ष देऊ नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. सर्वेक्षणाला विरोध करणे योग्य नव्हे, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले. रविवारी सकाळी बेंगळूरच्या सदाशिवनगर येथील निवासस्थानाजवळ त्यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर दिले.
मागील जनगणना योग्य नव्हती. त्यासाठी नवीन जनगणना केली जात आहे. मी सर्वांना यासाठी सहकार्य करण्याची विनंती करतो. सर्वेक्षण दोन ते तीन दिवसांत पूर्ण होईल का असे विचारले असता यावर उत्तर देताना शिवकुमार यांनी, संबंधित आयोग त्याबद्दल विचार करेल. नागरिकांकडून वैयक्तिक माहिती मागू नका. नागरिकांकडून कोंबड्या, मेंढ्या, दागिने, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर आणि इतर वैयक्तिक माहिती मागू नका, अशी सूचना अधिकाऱ्यांना केली आहे. ते काय करत आहेत हे मला माहिती नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.









