दोघांवर गुन्हा
सावंतवाडी
सावंतवाडी बाजारपेठेतील भाजी मार्केटजवळ कल्याण नावाच्या मटक्याचे आकडे स्वीकारताना पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. याप्रकरणी विजय बाबाजी चव्हाण (66) रा- उभा बाजार सावंतवाडी आणि अक्षय सावंत राहणार कोलगाव या दोघांविरोधात मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई शनिवारी दुपारी सावंतवाडी पोलिसांनी केली. या कारवाईत विजय चव्हाण यांच्याकडून मटक्याचे साहित्य आणि रोख रक्कम 1,930 रुपये रोख जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलीस हवालदार अनिल धुरी, महेश जाधव, मंगेश शिंगाडे, पवन परब आदींच्या पथकाने केली.









