वार्ताहर/उचगाव
उचगाव झोनल क्रीडा स्पर्धेमध्ये सुळगा (हिं.) येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेतील मुलांच्या खो-खो संघाने प्रथम क्रमांक मिळवून सुळगा गावची परंपरा कायम राखली आहे. या संघाची निवड तालुका पातळीवर झाली आहे. या संघाला प्रभारी मुख्याध्यापिका संगीता कुडची यांचे मार्गदर्शन लाभले असून शाळेतील शिक्षक, शाळा सुधारणा कमिटी या सर्वांचे मार्गदर्शन लाभले आहे.









