वृत्तसंस्था/ टोकियो
एटीपी टूरवरील येथे सुरु असलेल्या जपान खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनचा टॉप सिडेड कार्लोस अल्कारेझने एकेरीची उपांत्य फेरी गाठताना जपानच्या नाकाशिमाचा पराभव केला.
उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अल्कारेझने नाकाशिमावर 6-2, 6-4 अशी मात करत शेवटच्या 4 खेळाडूत स्थान मिळविले. 2025 च्या टेनिस हंगामातील अल्कारेझचा एकेरीतील हा 65 वा विजय आहे. दुसऱ्या एका सामन्यात अमेरिकेच्या द्वितीय मानांकित टेलर फ्रित्झने आपल्याच देशाच्या सेबेस्टियन कोर्दाचा 6-3, 6-7 (5-7), 6-3 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे.









