वार्ताहर/सांबरा
बाळेकुंद्री खुर्द येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित श्री दुर्गामाता दौंडला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असून दौडीमुळे गावांमध्ये नवचैतन्य पसरले आहे. दौड दररोज एका गल्लीतून सुरुवात करण्यात येत असून तेथेच सांगताही करण्यात येत आहे .त्यामुळे दररोज कार्यकर्त्यांची संख्या वाढत आहे. दौडमध्ये सर्वजण पारंपरिक पोषाख परिधान करून सहभागी होत आहेत. तर दौड मध्ये अनेक देवदेवतांच्या घोषणा देण्यात येत असून स्फूर्तिगीते गाण्यात येत आहेत. दररोज दौड जाण्राया मार्गावर महिला आकर्षक रांगोळ्या रेखाटत आहेत तर ठीकठिकाणी दौडीचे आरती ओवाळुन स्वागत करण्यात येत आहे.









