युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांचे महत्वपूर्ण विधान
► वृत्तसंस्था /लंडन
चीन आणि भारत हे रशियाच्या युद्धाला अर्थपुरवठा करीत आहेत, या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या विधानाचा प्रतिवाद युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी केला आहे. ट्रंप यांनी हे विधान मंगळवारी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत भाषण करताना केले होते. रशिया-युव्रेन युद्ध थांबावे, हेच भारताचे मत असून भारत हा पुष्कळसा युव्रेनच्याच बाजूचा आहे. मात्र, भारताच्या ऊर्जा आवश्यकता आहेत. त्या भागविण्यासाठी त्याला रशियाकडून तेल खरेदी करावी लागते. भारताच्या या आवश्यकतांचा विचार केल्यास भारत आमच्या बाजूने निश्चितच आहे, असे महत्वपूर्ण वक्तव्य त्यांनी केले आहे.
रशिया अणि युक्रेन यांच्यातील युद्ध लवकरात लवकर थांबेल, असे भाकित त्यांनी केले. हे युद्ध कोणासाठीही लाभाचे नाही. सर्व संबंधितांना याची जाणीव आहे. ऊर्जापुरवठ्याच्या संदर्भात काही आव्हाने आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांन्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. ऊर्जेसंबंधीच्या अडचणी ते निश्चितच समजून घेतली. ते या सर्व बाबी उत्तमरित्या व्यवस्थापित करु शकतात. त्यामुळे आम्ही आशावादी आहोत, असे वक्तव्य त्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. ही मुलाखत त्यामुळे महत्वाची मानण्यात येत आहे.
भारताच्या भूमिकेत परिवर्तन शक्य
युरोप आणि भारत यांच्यात निकटचे सहकार्य प्रस्थापित झाल्यास भारताची भूमिका परिवर्तीत होऊ शकते. भारत पूर्णपणे युक्रेनच्या बाजूने येऊ शकतो. भारत आमच्यापासून दूर जाऊ नये, यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न आम्ही केले पाहिजेत. तसे प्रयत्न केल्यास भारत आपल्या भूमिकेत आवश्यक ते परिवर्तन करु शकतो, हे मी निश्चितपणे मानतो, असे प्रतिपादन वाsलोदिमीर झेलेन्स्की यांनी केले.









