दत्तात्रय यादव हे जनावरांना चारा आणण्यासाठी शेतात गेले होते
By : विश्वनाथ मोरे
कसबा बीड : कोगे तालुका करवीर येथील दत्तात्रय शामराव यादव (वय 47) यांचे सर्पदंश झाल्याने निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, कोगे गावातील दत्तात्रय यादव हे जनावरांना चारा आणण्यासाठी शेतात गेले होते. सकाळी आठच्या सुमारास गवत कापताना त्यांना सर्पदंश झाला. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.
उपचारात दरम्यानच त्यांचे निधन झाले. सदर घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यामध्ये झाली असून पुढील तपास ठाणे अंमलदार प्रदीप यादव व टीम करीत आहेत. दत्तात्रय यादव सर्वांशी मनमिळावू, बोलका स्वभाव आणि टू-व्हीलर गाड्या रिपेरिंग करण्याचे ते काम करत होते. त्यांच्या या अचानक जाण्यामुळे कोगे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात,आई वडील, पत्नी,दोन मुले, एक भाऊ व एक बहीण असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी सकाळी कोगे येथे आहे.








