प्रतिनिधी/ बेळगाव
केएलई सोसायटीच्या लिंगराज महाविद्यालयाच्या एनएसएस युनिटने एमएसएमई योजना आणि केव्हीआय योजनेच्या जागृतीविषयी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला हुबळी येथील केव्हीआय विभागीय कार्यालयाचे उपसंचालक सच्चिदानंद काशीकर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांशी बोलताना सच्चिदानंद काशीकर म्हणाले, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाद्वारे देण्यात येणारी मुख्य योजना म्हणजे पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना, जी शहरी आणि ग्रामीण भागात उद्योजकता आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेतून उद्योग सुरू करण्यासोबत त्यांना आर्थिक मदत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
केव्हीआयसीचे प्रशिक्षक प्रशांत एन. यांनी विद्यार्थ्यांना खादी ग्रामोद्योगबद्दल माहिती दिली. प्राचार्य डॉ. एच. एस. मेलिनमनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रा. शशिकांत कोण्णूर यांनी स्वागत केले. डॉ. एच. एम. चन्नप्पगोळ यांनी प्रास्ताविक केले. अक्षता अवलक्की हिने आभार मानले. यावेळी सी. एस. पाटील, डॉ. महेश गुरनगौडा यासह इतर उपस्थित होते.









