कोलकाता :
ब्रोकरेज फर्म आनंद राठी समूहातील आनंद राठी शेअर आणि स्टॉक ब्रोकर यांचा आयपीओ 23 सप्टेंबरला बाजारात खुला होणार आहे. 393 ते 414 प्रति समभाग अशी इशू किंमत जाहीर करण्यात आली असून 745 कोटी रुपये आयपीओतून उभारायचे उद्दिष्ट कंपनीने समोर ठेवलेले आहे. 23 सप्टेंबरला आयपीओ खुला होणार असून 25 सप्टेंबरपर्यंत गुंतवणूकदारांना यामध्ये बोली लावता येणार आहे. 745 कोटी रुपयांचे ताजे समभाग कंपनी सादर करणार आहे.









