वृत्तसंस्था/ गांधीनगर
गुजरातच्या कच्छ जिह्यात रविवारी दुपारी 3.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. यात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. गांधीनगरस्थित भूकंपशास्त्राrय संशोधन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा हादरा दुपारी 12:41 वाजता नोंदला गेला. या भूकंपाचे केंद्र भचौच्या उत्तर-ईशान्येस 12 किलोमीटर अंतरावर होते. गेल्या महिन्यात या प्रदेशात 3 रिश्टर स्केलपेक्षा जास्त तीव्रतेचे भूकंप चारवेळा नोंदले गेले आहेत. गुजरातमध्ये भूकंपाची नोंद होण्यापूर्वी ईशान्य भारतातील मेघालयमध्येही हादरे जाणवले होते.









