सावंतवाडी : प्रतिनिधी
मानसोपचारतज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांच्या अर्जमधले दिवस या पुस्तकाच्या कन्नड अनुवादाचे प्रकाशन २३ सप्टेंबर रोजी धारवाड येथे होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विमोचन संघटना कर्नाटकचे अध्यक्ष बी. एल. पाटील, अनुवादक आणि ज्येष्ठ स्त्री रोगतज्ञ डॉ. संजीव कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. धारवाड येथील स्वयंदीप झेन केंद्रातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या या अनुवादाचा प्रकाशन सोहळा सायंकाळी ६ वाजता कर्नाटक हितवर्धक संघाच्या धारवाड येथील आर. एच देशपांडे सभागृहात होणार आहे. यापूर्वी या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद प्रकाशित झाला असून तो ऐश्वर्या नायक यांनी केला आहे.









