याच्या गंधाने नजीक येणार नाहीत पुरुष
परफ्यूम आणि डियोडोरेंटचा वापर अनेकजण करत असतात. अमेरिकेत आता पुरुषांना दूर पळवून लावणारा परफ्यूम लावत युवती घराबाहेर पडत आहेत. जगभरातील महिला आता अत्तराला केवळ स्वत:चा गंध आणि आकर्षणाचे साधन मानत नाहीत. तर महिलांकडून आता पुरुष रोधक (मॅन रेपलेंट) च्या स्वरुपात याचा वापर केला जात आहे. न्यूयॉर्कच्या ब्युटी एन्फ्लुएंसर सोफ्या हिने आता पुरुष सहन करू शकणार नाहीत, अशा परफ्यूमची माहिती दिली आहे.
हा परफ्यूमचा वापर विषासारखा वाटू लागतो असे सोशल मीडिया क्रिएटर माइकी याने सांगितले आहे. या परफ्यूमचा वापर करणाऱ्या महिलांनी आता स्वत:चे अनुभव सोशल मीडियावर मांडले आहेत. पुरुषांना सर्वसाधारणपणे सौम्य गंध आवडत असतो. परंतु लाकडासारखा धूरदार किंवा मसालेदार गंध पुरुषांना अप्रिय असतो. याचमुळे महिला आता पुरुषांना दूर पळवून लावणारा परफ्यूम वापरत असल्याचे समजते.
मी घराबाहेर पडण्यापूर्वी पुरुषांना दूर पळवून लावणारा कोलोन लावून घेते. हा एक प्रकारचा लाइफ हॅक आहे. जो पुरुषांना नजीक येऊ नका, असा स्पष्ट संदेश देत असल्याचे एका महिलेने नमूद पेले आहे. त्रास देणाऱ्या पुरुषांपासून मुक्तता मिळविणाऱ्या परफ्यूमबद्दल कळले हे चांगले झाल्याचे अन्य महिलेने प्रतिक्रियेत म्हटले आहे. परफ्यूमसोबत ग्लिटर देखील महिलांसाठी उपयुक्त ठरला आहे. ग्लिटर शरीरावर सहजपणे चिकटते, ते हटविणे अत्यंत कठिण ठरत असल्याचे ब्युटी एक्सपर्ट्सचे सांगणे आहे.









