साळगाव प्रकल्पाबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाचा इशारा : जीवितास हानिकारक मोठे प्रदूषण होत असल्याचे सिद्ध
पणजी : गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्य सरकारच्या गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या महत्त्वाकांक्षी साळगाव घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाला परिसरातील जलस्रोत प्रदूषित केल्याबद्दल ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. या नोटिशीत गौरावाडा-कळंगुट येथे एका झऱ्याचे प्रदूषण झाल्याचे आढळले असल्याने सदर प्रकल्प बंद का करू नये? आणि पर्यावरण नुकसानीबद्दल भरपाई का घेऊ नये? असे सवाल केल्याने सरकारी अधिकाऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण पसरले आहे. कळंगुट परिसरातील गौरावाडा येथे एका झऱ्याचे प्रदूषण झाल्याची तक्रार एका स्थानिकाने गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती. या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी 26 मे 2025 रोजी साळगाव कचरा प्रकल्पाची आणि आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे उघड झाले.
नेमके काय आहे प्रदूषण?
- पाहणीच्यावेळीप्रकल्पापासून 350 मीटरवर दोन झरी असल्याचे दिसले.
- त्यातीलएका झऱ्याचे पाणी राखाडी रंगाचे आढळले.
- राखाडीरंगाच्या पाण्याला असह्या दुर्गंधी येत होती.
पाण्याच्या चाचण्यांमध्ये आढळले काय?
- प्रयोगशाळेतीलचाचण्यानंतर स्पष्ट झाले की, त्या पाण्यात ट्युर्बीडीटी, क्लोराईड आहे.
- विरघळलेलेघन पदार्थ आहेत.
- क्षारता, बोरॉन, लोहाचीमर्यादेपेक्षा अधिक मात्रा सापडली.
- मानवीआणि प्राण्यांच्या जीवाला हानिकारक असे बॅक्टेरिया सापडले.
- अतिसार, मूत्रमार्गाचेसंक्रमण, न्यूमोनिया किंवा मूत्रपिंड निकामी होणे यासारखी गंभीर आजार निर्माण करणारे ‘ई-कोलाय’ बॅक्टेरिया सापडले.
अचानक केलेली पाहणी आणखी धक्कादायक
- प्रदूषणनियंत्रणमंडळाने अचानक 17 ऑगस्ट 2025 रोजी पुन्हा पाहणी केली.
- त्यावेळीएकाटाकीतील ‘आरओ-रिजेक्ट’ सांडपाणी खुल्या गटारातून सोडले जात असल्याचे दिसले.
- संतापजनकबाब म्हणजे रात्रीच्या वेळेस आणि पाऊस पडत असताना हे सांडपाणी सोडले जात असल्याचे त्यांना आढळले.
- हेसांडपाणी उत्तरेकडील जमिनीत सोडले जात होते.
- यामुळेआजूबाजूच्या विहिरी, झरे आणि जलसाठा प्रदूषित होत असल्याची माहिती प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना होती.
- अशाप्रकारचीउल्लंघने याआधीही अनेकवेळा करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीत आढळून आले.
सदस्य सचिव जोगळेकर यांचा इशारा
दुसऱ्या झरीतील पाण्यात मात्र काही धोकादायक जिवाणू आढळले नसल्याचा अहवाल मंडळाने या नोटिशीसोबत जोडला आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव आजीव जोगळेकर यांनी साळगाव कचरा प्रकल्पाचे कामकाज पूर्णपणे थांबवण्याचा आदेश काढला आहे. या आदेशाचे पालन न केल्यास मंडळाला यापुढे कोणतेही कारण न देता सदर कचरा प्रकल्पाला टाळे ठोकण्याची प्रक्रिया सुऊ करण्याचा इशारा दिला आहे.
अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकावे
साळगाव कचरा प्रकल्पातील घोटाळा ही मानवनिर्मित चूक नाही तर सरकारनेच निर्माण केलेली आपत्ती आहे. जर साळगाव कचरा प्रकल्प बंद पडला तर उत्तर गोव्यातील पंचायतींच्या कचऱ्याची कशी विल्हेवाट लावली जाणार, हा सरकारपुढे यक्षप्रश्न आहे. या प्रकल्पामुळे कांदोळी आणि नेऊलमध्येही दुर्गंधी जाणवत आहे. स्थानिकांना मंद गतीने विषबाधा होत असून सामान्य लोकांचे जीव धोक्यात आणल्याबद्दल या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना तुऊंगात टाकावे अशी मागणी ट्रोजन डिमेलो यांनी केली आहे.









