वार्ताहर/किणये
सार्वजनिक शिक्षण खाते यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत ज्योती हायस्कूल कर्लेच्या खेळाडूंनी यश संपादन केले. या स्पर्धेत स्वयंम कर्लेकरने 800 मी., 1500 व 3000 मी धावणे प्रकारात द्वितीय, मारुती पाटीलने 110 मी. अडथळा, भालाफेकमध्ये प्रथम, राणी हळबने 100 मी. अडथळा व 400 मी. अडथळा शर्यतीत द्वितीय, मंगल नागेनहट्टीकर पोल वॉल्टमध्ये प्रथम, कार्तिक गुरव पोल वॉल्टमध्ये द्वितीय, कस्तुरी पाटील भालाफेकमध्ये तृतीय क्रमांक मिळविला.









