थायलंड स्वत:चे समुद्रकिनारे आणि तेथील पर्यटनासाठी ओळखला जातो, हा एक स्वस्त आणि अत्यंत लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. भारतीयांमध्ये तर सर्वाधिक लोकप्रिय विदेशी पर्यटनस्थळ आहे. थायलंड स्वत:चे बीचलाइफ आणि पार्ट्यांसाठी ओळखला जातो. याचदरम्यान थायलंड आणखी एका कारणासाठी चर्चेत असतो. थायलंडमधील बाम अत्यंत प्रसिद्ध असून त्याचे नाव हॉन्ग थाई इन्हेलर आहे. काही लोक थायलंडमध्ये जाऊन घाऊक स्वरुपात हा बाम खरेदी करून आणतात. याचे वैशिष्ट्याच याकरता कारणीभूत आहे. हा बाम जो वापरतो, तो त्याचे गुण गाऊ लागतो. हिरव्या रंगाच्या डबीत मिळणाऱ्या या बामचा सोशल मीडियावरही जलवा आहे. हॉन्ग थाई बामचे वैशिष्ट्या म्हणजे याला एकदा हुंगल्यावर मेंदू ताजातवाना होतो. शरीराचा सर्व थकवा दूर होतो आणि माणूस स्वत:ला फ्रेश समजू लागतो. थायलंडला जाणारे लोक तेथील बीच पार्टी, डान्स आणि समुद्राची सैर करून हॉटेलमध्ये परतल्यावर शरीर थकलेले असते. अशा स्थितीत तेथील रस्त्यांवर मिळणारा हा हॉन्ग थाई बाम लोकांचा थकवा मिटविण्याचे रामबाण काम करतो.
इतकी आहे किंमत
हॉन्ग थाईच्या याच वैशिष्ट्यांमुळे विदेशी लोक तो खरेदी केल्याशिवाय परतत नाहीत. हा बाम पूर्णपणे एक हर्बल प्रॉडक्ट आहे, याचा गंध घेताच लोक स्वत:च्या वेदना आणि थकवा विसरून जातात. याच्या एका डबीची किंमत 60-70 रुपयांदरम्यान असते. थायलंडच्या संस्कृतीत सुगंध अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सुगंधाचा एका चिकित्सा पद्धतीच्या स्वरुपात वापर होतो. तेथील चिकित्सा पद्धतीत अशी हर्बल औषधे तयार केली जातात, जी सुगंधावर आधारित असतात. हा हॉन्ग थाई बाम देखील अशाच एक हर्बल प्रॉडक्ट आहे.
मेन्थॉलचा वापर
बामच्या निर्मितीत मेन्थॉलचा वापर होतो, जो थंडपणाची अनुभूती देतो. याचमुळे हे नाकाला अत्यंत साफ ठेवते, याचबरोबर नीलगिरीचे तेल आणि बोर्नियोल असते, जे नर्वस सिस्टिमला स्टिम्युलेट करते, यामुळे लोक स्वत:ला फ्रेश समजू लागतात.
हॉन्ग थाई बामची कहाणी
या बामची निर्मिती 20 वर्षापूर्वी सुरु झाली. तेरापोंग रबुथम उर्फ केंग नावाच्या इसमाने वृत्तपत्रात या बामच्या तयार करण्याची प्रक्रिया वाचली, यानंतर त्याने हा बाम तयार करत याचे काही डबे विकण्यास सुरुवात केली. लोकांना हे पसंत पडल्याने माउथ पब्लिसिटी सुरू झाली आणि लोक दूरदूरवरून शोधत कँगपर्यंत पोहोचू लागले. यानंतर कँगच्या मनात स्वत:चा हा व्यापार वाढविण्याची कल्पना आली आणि त्याने स्वत:ला झोकून देत व्यापार वाढविण्यास सुरुवात केली. 2022 पर्यंत कँगचे हॉन्ग थाई बाम तयार करण्याचा व्यवसाय 14 दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचला आणि आज पूर्ण जग या बामचे चाहते झाले आहे.









