वार्ताहर/किणये
सार्वजनिक शिक्षण खाते व क्रीडा विभागच्या वतीने नुकत्याच जिल्हा क्रीडांगणावर तालुकास्तरीय अॅथलेटिक्स क्रीडा स्पर्धा झाल्या या स्पर्धेमध्ये द.म.शि.मंडळच्या संचलित मंडोळी हायस्कूलच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे व या खेळाडूंची जिल्हास्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वैयक्तिक मुलींमध्ये सुचित्रा कांबळेनी लांबउडी प्रथम व तिहेरी उडीमध्ये प्रथम,ममता फगरेने 400 मी. अडथळा शर्यत प्रथम, लांबउडीमध्ये द्वितीय, तिहेरी उडीमध्ये द्वितीय,ऋतुजा साळवीने थालीफेक द्वितीय,भालाफेक द्वितीय, मनाली हिंडलगेकर थाळीफेक तृतीय,सानिका फगरे साखळी गोळाफेक द्वितीय तर वैयक्तिक मुलांमध्ये समर्थ साळवीने पोलवॉल्ट प्रथम क्रमांक, साईराज पाटील पोलवॉर्डमध्ये द्वितीय, प्रथम पाटीलने साखळीगोळा प्रथम क्रमांक.14 वर्षाखालील मुलींमध्ये स्नेहल पाटीलने लांब उडीमध्ये द्वितीय, 14 वर्षाखालील मुलांमध्ये सक्षम पाटील 80 मीटर अडथळा मध्ये द्वितीय क्रमांक, पार्थ कणबरकरने थाळीफेक मध्ये द्वितीय. 14 वर्षाखालील सांघीक मुलांमध्ये थ्रोबॉल द्वितीय तर हायस्कूलतील पार्थ कणबरकर, प्रणव दळवी, स्वप्नील कणबरकर यांची जिल्हास्तरीय थ्रो बॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंना मुख्याध्यापक जी.पी. मिसाळे यांचे सहकार्य व क्रीडा शिक्षक एस. एन. बेळगुंदकर व सह शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे.









