अभिनेता जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत
अभिनेता जॉन अब्राहम सत्यघटनांवर आधारित चित्रपटांना अधिक प्राधान्य देतो. ‘परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण’, ‘बाटला हाउस’ आणि ‘द डिप्लोमॅट’ या चित्रपटानंतर आता तो मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या बायोपिकमध्ये व्यग्र आहे. याचबरोबर तो आणखी एका सत्यघटनेवर आधारित चित्रपट करणार आहे. दिग्दर्शक शिवम नायर यांच्यासोबत जॉन हा ऑपरेशन गंगावर आधारित चित्रपट निर्माण करणार आहे.
2022 मध्ये रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाल्यावर युक्रेनमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी अडकून पडले होते. अशास्थितीत भारत सरकारकडून ऑपरेशन गंगा अंतर्गत सर्व भारतीय विद्यार्थ्यांना सुखरुप मायदेशी आणले गेले होते. 3 वर्षांपूर्वी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत 18,282 भारतीय नागरिकांना 90 विमानो•ाणांद्वारे मायदेशी परत आणले गेले होते.
जॉन यावर आधारित चित्रपटात अभिनय करण्यासोबत याची निर्मितीही करणार आहे. पुढील वर्षी याचे चित्रिकरण सुरू होणार आहे. जॉनचे चालू वर्षात दोन चित्रपट प्रदर्शित झाले असून दोन्ही सत्यघटना आणि देशभक्तीवर आधारित होते. यात द डिप्लोमॅट आणि तेहरान चित्रपट सामील आहे.









