100 कोटी रुपये अनुमानित किंमत
इतिहासात नोंद असलेला एक महाल आता खरेदी करण्याची संधी आहे. इटलीच्या लुक्का शहरातील 16 व्या शतकातील हा महाल कधीकाळी नेपोलियनची कनिष्ठ भगिनी कॅरोलिन बोनापार्टचे निवासस्थान होता, आता हा महाल विक्रीसाठी उपलब्ध आहे. लियोनार्ड लक्झरी रियल इस्टेटनने या ऐतिहासिक संपत्तीला विक्रीसाठी उपलब्ध्म केले आहे. या महालाची किंमत 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. हे काही साधारण घर नसून इतिहासाचे एक जिवंत पान आहे, ज्यात कला, वास्तुकला आणि शाही जीवनाची झलक दिसून येते.
लियोनार्ड लक्जरी रियल इस्टेटनुसार या व्हिलाची किंमत 10 दशलक्ष युरोपासून सुरू होते आणि ती 15-20 दशलक्ष युरोपर्यंत जाणार आहे. लुक्काचा हा व्हिला ऐतिहासिक वारसा असून जगात अद्वितीय मानला जात असल्याचे कंपनीचे सीईओ दिमित्री कॉर्टी यांचे सांगणे आहे.
व्हिलाची अद्भूत वास्तुकला
या महालाचे सौंदर्य याच्यात असलेल्या कलाकृती आणि सजावटीमुळे आणखी वाढते. येथे 1700 च्या दशकातील प्लास्टर आणि पियर डांडिनीची दोन मोठी चित्रे आहेत. घराचा सर्वात मोठा सॅलून, आकर्षक स्वागत कक्ष, क्रीडाकक्ष, भोजन कक्ष आणि रेशमी भिंतींनी युक्त लाल कक्ष याचे विशेष आकर्षण आहे. तसेच एक वेगळ्या एनेक्समध्ये 5 आलिशान शयनकक्षही निर्माण करण्यात आले आहेत.
व्हिलाची वैशिष्ट्यो
या महालाभोवती 14.8 एकरचे क्षेत्र असू यातील निम्म्या हिस्स्यात पार्कलँड आहे, तर निम्म्या हिस्स्यात झाडे आहेत. येथे दोन स्वीमिंग पूल असून तिसरा पूल देखील तयार होत आहे. याचबरोबर एक हेलिपोर्ट आणि एक प्राचीन दगडी वॉशहाउस आहे, ज्याला आणखी एका एनेक्समध्ये बदलले जाऊ शकते. व्हिलासोबत एक छोटा 18 व्या शतकातील चर्च आणि लेमन हाउस देखील आहे. जेथे 100 हून अधिक लिंबाची झाडं आहेत.
ऐतिहासिक वारसा
ही संपत्ती 16 व्या शतकातील आहे, परंतु वर्तमान ढांचा 18 व्या शतकातील रेशीम व्यापारी कोरिओलानो ओरसुची यांनी तयार करविला होता. त्यांनी प्रसिद्ध बारोक वास्तूकार फिलिपो जुवारो यांच्याकडून याचे डिझाइन आणि विस्तार करविला होता. व्हिलाचा फ्रंट संगमरमरी झालर आणि जुन्या स्तंभांनी सजविलेला आहे. तर अंतर्गत हिस्सा सुमारे 2500 चौरस मीटरमध्ये फैलावलेला आहे. यात तीन मजले, एक अटारी आणि एक तळघर आहे.









