गळ्यात बांधून घेते पट्टा
जगात अनेक लोकांना श्वान पसंत असतात, तर काही लोक श्वानांना स्वत:च्या अपत्यांप्रमाणे मानू लागतात. परंतु एका युवतीने याप्रकरणी हद्दच केली आहे. ही युवती स्वत:च श्वानांप्रमाणे वागत असून स्वत:ला डॉग डॉटर म्हणवून घेत आहे.
जपानमधून फैलावलेल्या या अनोख्या संस्कृतीने आता जगभरात युवांना आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. ही संस्कृती ‘केमोनोंमिमी’ असून याचा अर्थ माणसांना प्राण्यांसारख्या वैशिष्ट्यांसह स्वत:ला सादर करणे’ आहे. अलिकडेच अमेरिकेत राहणारी 20 वर्षीय युवती मिल्क चर्चेत आली आहे. तिने स्वत:ला इमुमिमीच्या स्वरुपात सादर केले आहे. जपानी एनीमे आणि मंगाच्या जगतात ‘केमोनोंमिमी’ शब्दाचा वापर अशा पात्रांसाठी केला जातो, ज्यांच्याकडे मानवी शरीरासोबत प्राण्यांसारखी वैशिष्ट्यो म्हणजेच कान आणि शेपूट असते. इनुमिमीचा अर्थ डॉग डॉटर असून यात व्यक्ती श्वानासारखे कान आणि शेपूट लावत घेत स्वत:ची ओळख व्यक्त करत असतो.
एक वर्षापूर्वी केमोनोंमिमीविषयी कळले, ते स्वीकारावे अशी भावना निर्माण झाली. आता मी डॉग कान आणि शेपूट लावून घेत बाहेर पडते आणि यामुळे माझे जीवन बदलून गेले आहे. या संस्कृतीशी जोडले गेलेले लोक खरोखरच कमाल आहेत. या संस्कृतीमुळे मला स्वत:ला व्यकत करण्यासाठी अधिक आत्मविश्वास मिळाला. लोक माझ्या स्टाइलला पसंत करतात. परंतु प्रत्येकाची भूमिका सकारात्मक नसते, अनेकदा लोक माझी थट्टा करतात, असे मिल्क सांगते.
मिल्ककडे एक हँडलर देखील आहे, म्हणजेच एक मित्र आहे जो तिची देखभाल करतो. तिच्यासोबत खेळतो. कधीकधी टग ऑफ वॉरही खेळतो. मिल्कचे आईवडिल प्रारंभी या लाइफस्टाइलला अजब मानत होते, परंतु मिल्क या स्टाइलद्वारे स्ट्रीमिंग देखील करत असल्याचे कळल्यावर त्यांनी याचा स्वीकार करण्यास सुरुवात केली आहे.









