कोल्हापूर :
सध्या होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोल्हापूर महानगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीत महायुती एकत्र लढणार आहे. या निवडणुकीत घटक पक्ष म्हणून कीती जागा मागायच्या यासंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील व जनसुराज्यचे प्रा. जयंत पाटील यांच्यात भाजप कार्यालयात सुमारे तासभर बंद दाराआड चर्चा झाली. असून यात होणाऱ्या निवडणुकीत पक्षाची रणनीती व महायुतीच्या जागा वाटपा बाबत झालेल्या प्राथमिक चर्चेत मुंबई येथे बैठक घेण्याचे ठरले असून ही बैठक मंत्री हसन मुश्रीफ हे लंडन दौऱ्यावरुन परत आल्या नंतर होणार आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीतील काही घटक पक्ष 30 पेक्षा कमी जागा घेण्यास तयार नाही. जागा वाटपाची चर्चा होण्यापूर्वीच पक्षांनी आपला आकडा ठरविल्याने जागा वाटपाचा पेच निर्माण होणार आहे. त्यामुळे महायुतीची ओढाताण ही होणारच आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाने आपल्या बळकटी करणासाठी पक्षाची ताकद असलेल्या ठिकाणी उमेदवार देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे सध्या महायुतीत जागा कमी आणि मागणी जास्त अशी परिस्थिती झाली आहे. होऊ घातलेली निवडणूक ही पाच वर्षांनी होत आहे. या दरम्यान राज्याबरोबर जिल्हातील राजकारणात अनेक उलथापालथ झाली आहे. कोल्हापूर महापालिकेतील वर्चस्वासाठी सर्वच पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावण्याचे ठरविले असून, महायुती आणि महाविकास आघाडीत सामना होण्यापूर्वीच महायुतीतील घटक पक्षातच जागा मागणीवरून मध्यतंरी जुंपली होती. जिह्यातील सध्याच्या यशावर जागा वाटप करावे, असा सुर शिंदे गटातून येत आहे. सध्या त्यांच्याकडे एक खासदार, चार आमदार तसेच पालकमंत्रिपदही आहे. तर भाजपचा एक राज्यसभा खासदार, दोन पक्षाचे, एक सहयोगी असे तीन आमदार, जनसुराज्य शक्ती पक्षाचे दोन आणि अजित पवार राष्ट्रवादीचे गटाचे एक आमदार असे जिह्यात पक्षीय बलाबल आहे.
मध्यंतरी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या मेळाव्यात जागा वाटपात 33 पेक्षा कमी जागा घेणार नाही, आणि महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकवणार, असे म्हटल्याने या चर्चेला तोंड फुटले. त्यानंतर महायुतीतील तुल्यबळ शिंदे सेनेच्या बैठकीतही आम्ही 33 पेक्षा कमी जागा घेणार नाही. असा नारा दिला. यावर दादाच्या राष्ट्रवादीने अद्याप जागा वाटपाची बोलणी किवा प्रक्रीया सुरू नाही. त्यामुळे कोण काय म्हणाले याला अर्थ नाही असे सांगितले होते. मात्र त्यावेळी 30 पेक्षा कमी जागा आपण घ्यायच्या नाहीत. अशी भूमिका अजित पवार राष्ट्रवादीची आहे.
यावर शुक्रवारी मंत्री चंद्रकांत पाटील हे पक्षाच्या कार्यालयात कार्यक्रमासाठी आले असता. जनसुराज्यचे प्रा. जयंत पाटील यांनी मंत्री पाटील यांच्याशी बंद दाराआड सुमारे तासभर चर्चा केली. यात अजित पवार राष्ट्रवादी गटाचे मंत्री हसन मुश्रीफ हे काल शुक्रवार दि. 12 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर पर्यंत 10 दिवसांच्या इंग्लंड आणि स्कॉटलंड दौर्यावर गेले असुन ते दौर्यावरुन येताच महापालिकेच्या आगामी निवडणुकीतील जागा वाटपा संदर्भात मुबंई येथे बैठक घेण्याचे ठरले असुन. या बैठकीत घटक व मित्र पक्ष म्हणून कीती जागा मागायच्या यावर प्राथमिक चर्चा बंद दाराआड झाली.








